Monday 14 January 2013























विस्तार जरा आकाश, चमकुदे आणखी चार तारे 
एखादा सूर्यही असेल बघ त्यात..

तीन फुटी खिडकीतून दिसत असेलही आकाशाचा निळा तुकडा  
रात्री त्या काळ्या तुकड्यात इच्छा पूर्ण करणाऱ्या उल्काही दिसत असतील कदाचित..  
वर्षभर खिडकीतून भेटत असतील ऋतू.. 
चौकटीत इथे असं बसून थंडीच्या लाटेत गारठत असशील   
आणि चिंब भिजतही असशील मॉन्सूनच्या पावसात  ...

पण क्षितिजाचा परिघ आणि आकाशाच्या घुमटाची खोली 
तुझ्या द्विमितीय चौकटीतून कधी जाणवली आहे तुला?
ये जरा अशी बाहेर.. बघ तुलाही आणखी एक मिती आहे 
तुलाही खोली आहे..

विस्तार जरा आकाश, चमकुदे आणखी चार तारे 
एखादा सूर्यही असेल बघ त्यात..

- मयुरेश 
१४ जानेवारी, २०१३      

No comments:

Post a Comment